ओबीसी, मागास, दलितांच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही : पंतप्रधानांची ग्वाही

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झारखंड दौऱ्याचा शनिवारी दुसरा दिवस आहे. मी संविधान बदलणार आहे की आज मी ओबीसी मागास आणि दलितांच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही, असे ते म्हणाले.  तुमच्या एका मताने 500 वर्षांनी राम मंदिर बनले, असे म्हणत त्यांनी  आम्ही लव्ह जिहाद ऐकले होते, मग आम्ही लँड जिहाद ऐकले आणि आतापासून हे लोक कितीही जिहाद करत आहेत, हा देश मागे हटणार नाही. मोदी घाबरणार नाहीत. हि निवडणूक मजबूत देशासाठी मजबूत सरकार बनविण्यासाठी आहे. काँग्रेस नक्षलींना समर्थन देते.

बाबासाहेब आंबेडकरांना पूजणाऱ्यांपैकी मी एक आहे.  हे सर्व खोट्या गोष्टींचा प्रचार करत आहेत की मी मोदी आले तर संविधान बदलतील.  मी 10 वर्षे सरकार चालवत आहे, हे पाप मी करणार नाही. मी गॅरेंटी देतो की जोपर्यंत मोदी जीवित आहेत तोपर्यंत दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांचे थोडेसे देखील आरक्षण हे मुस्लिमांना देऊ देणार नाही.   भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपात एक मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. जो तुमच्या घरावर दरोडा टाकेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे., हे इंडी अलायन्सवाले भ्रष्टचाऱ्यांना वाचवायला सांगत आहेत. आगामी पाच वर्षांत अशा भ्रष्ट्राचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. झारखंडमध्ये सर्व प्रकारच्या परीक्षांचे पेपर लीक होतात. आम्ही दिल्लीत एवढा मोठा कायदा केला आहे की पेपर लीक करणाऱ्यांना जेलमध्ये आयुष्य काढावे लागेल.  तुम्हाला मोफत रेशन मिळत राहील, हे रेशन तुमच्या लोकांसाठी आहे.  सरकार भ्रष्ट आहे, बजेट कितीही असो, तिथे विकास होऊ शकत नाही, भ्रष्टाचाराची ही पोकळी अशी आहे की पैसे ओतले की थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात असे ते म्हणाले.