पारोळा । ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलनजीक घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
याबाबत असे की म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ओमनी गाडीमध्ये गॅस भरताना गॅस टाकीने अचानक पेट घेतला. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या दोन गाड्यांमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट झाला. दरम्यान, घटनास्थळी जवळपास डझनभर गॅस सिलिंडर पडलेल्या स्थित असल्याचे दिसून आले.
पहा व्हिडिओ
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार उल्हास देवरे, पोलिस उपनिरीक्षक तसेच पोलिसांसह शहर तलाठी निशिकांत माने आदी घटनास्थळी दाखल झाले. तर अपघाताची माहिती मिळताच दोन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अद्याप कोणत्याही दुखापतीची नोंद नसून आग विझवण्यात आली आहे. परिसरातील सर्व रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम राजकुमार आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश दिले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय अनिल पाटील आणि मंत्री गिरीश महाजन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.