मुंबई : ओला इलेक्ट्रिकने मार्च महिन्यासाठी त्यांच्या एसवन स्कूटर पोर्टफोलिओवर २५ हजार रुपयापर्यंत किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे भारताच्या विद्युतीकरणाच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि ईव्ही स्वीकारण्यासाठी अडथळे दूर करण्यासाठी कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता आणि उत्पादन प्रोत्साहनासाठी पात्रत या कारणांमुळे ही किंमत कमी करण्यात आली आहे. ओला एसवन खरेदी करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे.
कारण फेम योजना ३१ मार्च रोजी संपण्याची किंवा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना मार्च महिन्यांत या योजनेचा लाभ देण्याच्या उद्देशाने कंपनीने एसवन प्रो ही स्कुटर १,२९,९९९ रुपयांना मिळणार आहे तर, एसवन एअर १,०४,९९९ रुपये व एसक्न एक्स प्लस स्कुटर ८४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल.ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच ईव्हीचा अवलंब करण्यामधील सर्व अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नात उत्पादने, सेवा, चार्जिंग नेटवर्क आणि बॅटरी वॉरंटी अशा अनेक उपक्रमांची घोषणा केली आहे. ओला इलेक्ट्रिकने सध्याच्या ४१४ सेवा केंद्रांवरून एप्रिल २०२४ पर्यंत देशभरातील ६०० केंद्रांपर्यंत आपले सेवा नेटवर्क ५० टक्क्यांने विस्तारित करण्याच्या योजनांचे अनावरण केले.