ओव्हरटेकचा प्रयत्न : दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला पडले, बस थेट शेतात शिरली!

जळगाव : शहरातील दुरदर्शन टॉवरजवळ रविवारी सकाळी ११ वाजता ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीला बसचा कट लागून अपघात झाला. यात दुचाकीवरील कडू बावस्कर वय २७ व भुरा राजपूत वय 23, दोघे रा.नाडगाव, ता.बोदवड हे जखमी झाले. दोघांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले.

सूत्रानुसार, जळगाव-भुसावळ रस्त्यावरील दुरदर्शन टॉवरनजीक रविवारी, सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार ओव्हरटेक करीत असताना अचानक समोरून आलेल्या बस (एम.एच.14 बी.टी.0098) चा कट लागल्याने रस्त्याच्या कडेला पडून जखमी झाले तर अपघात टाळण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या खाली शेतात शिरली.

या अपघातात दुचाकीवरील कडू बावस्कर (27) व भुरा राजपूत (23, दोघे रा.नाडगाव, ता.बोदवड) हे जखमी झाले. दोघांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले तर कडू बावस्कर याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याचे सूत्रांनी सांगितले.