मुक्ताईनगर ः गुरे वाहतुकीची कुठलाही परवानगी नसताना अवैधरीत्याची गुरांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करीत 54 पारडूंची (हेलू) सुटक्ा केली तर दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळून कंटेनर (आर.जे.11 जी.बी.9487) मधून म्हशींचे 54 पारडूंची दाटीवाटीने निर्दयतेने अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. बुधवार, 6 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता डोलारखेडा फाट्याजवळ कंटेनर आल्यानंतर त्यास पोलिसांनी ताब्यात घेत 54 म्हशींच्या पारडूंची सुटका केली तसेच कंटेनर जप्त केला.
पोलिस कॉन्स्टेबल राहुल ताराचंद बेहनेवाल यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक मोहम्मद अहसान मोहम्मद अब्दुल गफार (35, रा.फिरोजपूर, जि. मेवाड, राज्य हरियाणा) व आजम खान अब्दुल हमीद (21, रा.बुकारका, ता.फिरोजपूर, जि.मेवात राज्य हरीयाणा) या दोघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलिस नाईक संदीप वानखेडे करीत आहे.