कंदील परिसरातील गुळवाले यांच्या कापड दुकानाला आग, पाच लाखाचे कापड खाक..!

धुळे :  शहरात काल मध्य रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ही  आग पाच कंदिल परिसरात एका कापड दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत  लाखोंचे साहित्य जळून खाक झाले.वेळीच  अग्निशमन दलाचे बंब पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरातील रहिवासी मनोहर रामेश्वर अग्रवाल ( गुळवाले ) यांच्या कापडाच्या दुकानाला रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग शॉर्टसक्रीटने लागल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी अग्नीउपद्रवाची माहिती अग्निशमन दलास दिली माहीती मिळताच अग्नीशमन  दलाचे बंब  घटनास्थळी पोहोचले. दोन बंबांच्या मदतीने अर्धातासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर काबू मिळवला.

घटनेत पाच लांखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर आगीची आजूबाजूच्या दुकानांनाही पोहोचली. अग्निशमन विभागाचे प्रमुख दुष्यंत महाजन, फायरमन अमोल सोनवणे, शाम कानडे, मनोज सरगर, संतोष शिरसाठ, योगेश मराठे, सिद्धार्थ खैरनार, राजेंद्र लहामगे, राहुल पाटील, अमोल सरगर, नरेंद्र बागुल, पांडुरंग पाटील, संतोष शिरसाट यांच्यासह परिसरातील सुनील महाले, वसीम बारी आदींनी परिश्रम घेतले. या परिसरात नेहमीच अशा घटना घडत असतात.