कट्टरपंथी युवक सिराज अहमदच्या त्रासाला कंटाळून हिंदू युवतीने स्वत:चाच गळा कापून आपले जीवन संपवले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडितेला नजीकच्या रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच याप्रकरणात आता सिराज अहमदला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील सिधी जिल्ह्यात घडलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच तक्रारीत लिहिले होते की, पीडित मुलगी आणि कट्टरपंथी युवक सिराज अहमद एका लग्न समारंभात भेटले होते. त्यावेळी त्याने युवतीचा फोन नंबर घेतला होता. त्यानंतर तो वारंवार पीडितेला फोन करून त्रास देऊ लागला होता. सिराज अहमद हा पीडितेचा पाठलाग करायचा.
सिराज अहमद अनेकदा तिच्या शाळेतही गेला होता. तिच्या गावतही जाऊ लागला होता. तसेच अनेकदा तिला फोन करून त्रास देऊ लागला होता. हळू हळू आरोपीच्या कारवायांमध्ये वाढ होऊ लागली होती. कट्टरपंथी युवकाने अनेकदा तिच्यासोबत वाईट चाळे केले होते. त्यानंतर ती शाळेतून बाहेर आल्यानंतर तिला सारा जाच असहाय्य झाला. तिने चप्पल शिवणाऱ्या दुकानावरची एक धारधार शस्त्र असलेली वस्तू घेतली आणि तिने स्वत:च्याच मानेवरून फिरवली. त्यावेळी तिच्या मैत्रींनीने हे कृत्य करण्यापासून अनेकदा मज्जाव केला. मात्र, पीडितेने युवकाच्या जाचाला कंटाळून स्वत:चा खून केला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तरूणाने तिथून पळवाट काढली. यावेळी पीडितेच्या काही विद्यार्थीनी मैत्रिणी या कट्टरपंथी तरूणावर पाळत ठेऊन होत्या. त्याचवेळी पीडितेला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची परिस्थिती चिंताजनक आहे.
त्याचवेळी सिराज हा घटनास्थळावरून पळ काढत होता. मात्र त्यावेळी काही जमलेल्या लोकांनी सिराजला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचे हात-पाय बांधून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.