---Advertisement---

करण पवार, श्रीराम पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, शिवतीर्थ मैदानावरून रॅलीला सुरवात

---Advertisement---

जळगाव : जळगाव व रावेर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार करण पवार आणि श्रीराम पाटील उमेदवारी अर्ज आज बुधवारी दाखल करत आहेत. शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत.

संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांची उपस्थिती
अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत, माजी खासदार उन्मेष पाटील, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जेष्ठ नेत्या वैशाली सूर्यवंशी, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख बुलाबराव वाघ आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष, तसेच इतर सर्व पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment