कल्याण लोकसभेतील सस्पेन्स संपला! फडणवीसांनी अखेर स्पष्टच सांगितलं

xr:d:DAFe8DR0y38:2506,j:6701780235577411383,t:24040605

मुंबई:  गेल्या काही दिवसांपासून कल्याणमधील महायुतीचा उमेदवार कोण असणार? ही चर्चा सुरु होती. भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु होता. शिवसेना कल्याण लोकसभेवरुन आपला दावा सोडण्यास तयार होत नव्हती. स्थानिक भाजप कार्यकर्ते विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना मदत करण्यास तयार नव्हते. यामुळे अजूनही कल्याण लोकसभेचा निर्णय जाहीर झाला नव्हता. अखेर कल्याणधील सस्पेन्स संपला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार जाहीर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता कल्याणमध्ये दुहेरी लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे आणि महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

नागपूर इथं भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, “श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध नाही. ते कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीनं आणि मागच्यावेळपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना आम्ही सर्वजण आमची बृहद युती निवडून आणेल” त्यामुळं आता कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असतील याची आता घोषणा झाली आहे.