---Advertisement---

कसबा-चिंचवड पोटनिवडणूक : भाजपाचा उमेदवार ठरला!

by team
---Advertisement---

पुणे : पोटनिवडणुक कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपामध्ये कुणाची उमेदवारी घोषित

हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपाकडून हेमंत रासने यांच्यासह गणेश बिडकर, धीरज घाटे आणि टिळक कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक होते इच्छुक होते. मात्र भाजपाकडून हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment