मुंबई: महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. अश्यातच काँग्रेसकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. यंदा काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकच उमेदवार दिला आहे.
जून २०२२ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. हांडोरे यांना उमेदवारी दिल्यानं पहिल्या पसंतीची मतं त्यांना मिळतील आणि ते विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, काँग्रेसची काही मतं फुटली आणि दुसऱ्या पसंतीची मतं नसल्यानं त्यांना पराभवाचा फटका बसला होता.
तसेच राजस्थानातून सोनिया गांधी, हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनु सिंघवी, बिहारमधून अखिलेश प्रताप सिंह तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे.