मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना पक्षात घेण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “जाणीवपुर्वक हा संभ्रम निर्माण केला जात आहे. तसेच काँग्रेसचे ७ आमदार आणि शरद पवार गटाचे ५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे.
लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले. अमोल मिटकरी म्हणाले की, “काँग्रेसचे आणि शरद पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. लोकसभेच्या पुर्वी त्यांचे प्रवेश होतील. त्यामुळे लोकसभेपुर्वी महाभुकंप होणार असून लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटातील काही लोकं अजितदादांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील.”
तसेच पवार परिवारात वितुष्ट निर्माण करण्याचं काम मुंब्रा कळव्यातून सुरु आहे. जितेंद्र आव्हाडच याचे मास्टरमाईंड आहेत. त्यामुळे घरफोडीचे काम करणाऱ्यांपासून सावध राहायला हवं, असे म्हणत त्यांनी आव्हांडांवर निशाणा साधला.