काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सुनावले संजय राऊतांना खडेबोल!

मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपदावरून खडेबोल सुनावले आहे. ज्याला सर्वात जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती पुढे आली होती. यावर आता चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. पण विरोधी पक्ष म्हणून निवडणूकीला सामोरं जात असताना चेहरा पुढे ठेवत नाही, अशी महाराष्ट्रात परंपरा आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढणार आहोत आणि सत्तेत आल्यावर तो जाहीरनामा पूर्ण करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी मान्यता मिळेल असं मला वाटत नाही. निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळतं, अशी परंपरा आहे. कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री करायचं हे त्या पक्षातील नेते ठरवतात. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.