---Advertisement---

काँग्रेसला मोठा धक्का! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

by team

---Advertisement---

नागपूर : रामटेक मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या संपूर्ण रामटेक मतदारसंघात जोमात प्रचार करत असताना दुसरीकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्जही बाद होऊ शकतो. काही दिवसांपुर्वी ऱश्मी बर्वे यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्रावर विरोधांकडून आक्षेप घेण्यात आला होता. हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप विरोधकांनी केला. बर्वे यांच्याविरोधात सुनील साळवे नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली होती. सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळी राजकीय सुडभावनेतून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत, असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यानंतर आता बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीने दिला आहे. या एका निर्णयामुळे बर्वे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

आता पुढे काय होणार?
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 मार्च होती. त्यामुळे बर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला. हा अर्ज दाखल करताना त्यांनी रामटेकमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन केले. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात वैधता पडताळणी समितीने बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रामटेक या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार बाद ठरू शकतो. दरम्यान, या सर्व शक्यता असल्या तरी लवकरच बर्वे यांच्या उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---