गडचिरोली : प्रत्येक पक्ष आपले मतदारसंघात निवडणूकीसाठी उमेदवार घोषित करत आहे.अश्यातच एक बातमी समोर आली आहे, भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते यांनी पक्षसदस्त्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती त्यांचा भाजप प्रवेश झाला.
काँग्रेसने गुरूवारी रात्री २१ मार्च रोजी महाराष्ट्रातील आपली पहिली यादी जाहीर केली होती. गडचिरोली-चिमूर मतदार संघात उमेदवारी मिळावी, अशी डॉ. नितीन कोडवते यांची इच्छा होती. पण या यादीत गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे त्यांनी नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. नितीन कोडवते हे काँगेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.