लहान मुलांना नेहमी गोष्ट सांगताना एक पद्धती वापरली जाते. सांगितले जाते की, खूप खूप वर्षांपूर्वी एक राजा होता… अगदी तशी अवस्था जिल्ह्यातील काँग्रेसची झाली आहे. जुने जानते काँग्रेसी सांगतात की, खूप खूप वर्षांपूर्वी हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अनेक दिग्गज नेते या जिल्ह्यात होऊन गेले. त्या वेळच्या काँग्रेसने त्यांना मोठमोठी पदे दिली. स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी, स्व.जे.टी. महाजन, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशा दिग्गजांनी या जिल्ह्याचे नेतृत्व केले.
लौकीकामुळे पक्षाचा मोठा विस्तार व प्राबल्य या जिल्ह्यात होते. म्हणतात ना कोणतीही पुण्याई फार काळ टिकत नाही. जाणीवपूर्वक परिश्रम केले तरच लौकीक व प्राबल्य कायम रहाते. अगदी तशीच परिस्थिती या पक्षाची जिल्ह्यात होती. नेते मंडळींनी काय केले तर पक्ष वाढीपेक्षा स्वतःच्या संस्था वाढविल्या. परिणामी पूर्वी जनसंघनंतर भाजप, शिवसेना काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष यांनी राष्ट्रीय काँग्रेसला कोसो दूर टाकले. आणि आता शिल्लक वेळ आली आहे. हे निश्चित. असलेली मंडळी जावे कोठे या विचारात आहेत.
पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी या पक्षाला रामराम ठोकणे ही या जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बाब आहे. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या संपर्कात होत्या. जामनेर तालुक्यातील गोद्री येथे झालेल्या हिंदू गोर बंजारा व नायकडा समाज महाकुंभाच्या प्रसंगी देशभरातून गोर बंजारा समाज बांधव आले होते. १० ते १५ लाखांची या छोट्या गावात हजेरी होती. आलेल्या हिंदू बांधवांचे स्वागत मोठमोठे फलक लावून डॉ. केतकी यांनी केले होते. याचवेळी राजकारण्यांच्या भुवया उंचावत्या होत्या.
डॉ. केतकी यांची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने आहे हे त्याचवेळी अनेकांच्या लक्षात आले. त्यांनी देखील ‘ताकाला जाऊन भांडे न लपविण्याची’ भूमिका घेत आपण भाजप प्रेमीच असल्याचे दाखवून दिले… एवढेच नव्हे तर तशी कृतीही दाखविली. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना त्यांच्या काही जुन्या मंडळींकडून विरोधही झाला पण ही भूमिका डॉ. केतकी यांची वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही काही कुरापतखोर मंडळींचे डावपेच सुरू होते. वास्तविक जिल्ह्यात काँग्रेसची आंदोलने फारशी गी होत नसली तरी जी व्हायची ती केवळ डॉ. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाने व मदतीने.
काही जणांनी तर त्यांना गत काळात अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नको नको ते आरोप त्यांच्यावर लावले गेले. तरीही डॉक्टर उल्हास पाटील डगमगले नाही पण आता नावातच ‘नाना’ असलेल्या नाना पटोले यांच्या आदेशानुसार त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. याचे पर्यावसास डॉक्टर उल्हास पाटील यांनी भाजपची वाट धरली. काहीसा उशिरा डॉक्टरांनी चांगला निर्णय घेतला अशा प्रतिक्रीया आता उमटत आहेत. सध्या भाजपचे बेरजेचे राजकारण सुरू आहे. यात पक्षातील काही मंडळींकडून नाराजी व्यक्त केली जाते पण भविष्यात ज्या गोष्टी साध्य कराव्याच्या आहेत त्यासाठी काही तडजोडी या आवश्यक आहेत. डॉ. उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशातून पक्षाचा निश्चितच फायदा आहे.
जिल्ह्यातील काही राजकीय समिकरणे यामुळे सोपी होणार आहेत. विशेष म्हणजे आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. लोकसभा त्या पाठोपाठ विधानसभा, मनपा, पालिका, जिल्हा परिषदा अशा निवडणुका होऊ घातल्या आहेत. राजकीय उलधापालथीत आणखी काही उड्या अपेक्षित आहेत. जिल्ह्यात शिवसेना उबाठाची दैना झाली आता काँग्रेसही त्या पाठी आहे. अगदी जिल्ह्यात काँग्रेस कोठे दाखवा म्हणण्याची
चंद्रशेखर जोशी