बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या बुटाची लेस बांधत एका काँग्रेस कार्यकर्त्याने राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची घटना आहे. ही घटना कर्नाटकातील बंगळुरू येथे २ ऑक्टोंबर रोजी घडली असून राष्ट्रप्रेमाच्या बढाया मारणाऱ्या काँग्रेसी वृत्तीने राष्ट्रध्वजाची विटंबना केली आहे. त्यांना राष्ट्रप्रेमाहून एखाद्या नेत्याची हुजरीगिरी करणे अधिक महत्त्वाचे वाटते. यामुळे आता काँग्रेस पक्ष आणि सिद्धरामय्यांवर टीका होत आहे.
नेमके काय घडले आहे?
बंगळुरू येथे २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सिद्धरामय्यांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी सिद्धरामय्या हे गांधींजींना नमन करण्यासाठी पुढे आले. ते पायातील बुट काढत होते. मात्र त्यांना बूट काढता आला नाही. तेव्हा काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या हातात राष्ट्रध्वज असताना त्याने सिद्धरामय्यांच्या पायातील बुट काढला. या कृतीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
नुकतीच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक पार पडली आहे. मात्र याच जम्मू -काश्मीर येथे मोदी सरकारने कलम ३७० हटवले त्याविरोधात काँग्रेसने आवाज उठवला होता. एवढेच नाहीतर भारताविरोधात अनेक परदेशातील नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. काही दिवसांआधी राहुल गांधी हे इल्हान उमर यांच्या भेटीला गेले होते. इल्हान उमर यांनी भारताविरोधी वक्तव्य केले आहे. ते भारतापासून खलिस्तान आणि कश्मीरला वेगळे करण्यासाठी समर्थन देत आहेत.