नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरुन २० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. आहे. तसेच खाद्यतेलाच्या आयातीवर आता २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरुन २० टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे संपविली आहे. त्यामुळे यातून कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळेल.
तसेच आतापर्यंत खाद्यतेलाच्या आयातीवर आधी कोणतेच शुल्क नव्हते. आता त्यावर २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल. याशिवाय रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर कस्टम शुल्क १२.५० टक्क्यांहून ३२.५० टक्के करण्यात आला आहे. यासोबतच बासमती तांदळाच्या निर्यातीसाठीसुद्धा किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे.