जम्मू-काश्मीर: कलाम ३७० सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे, आणि भारताच्या संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालाविषयी समाधान व्यक्त केले आहे. कलम ३७० रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक आणि भारताच्या संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवणारा आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील आपल्या बंधू- भगिनींसाठी आशा, प्रगती आणि एकतेची दमदार घोषणा आहे. न्यायालयाने आपल्या प्रगल्भ दृष्टिकोनातून, आपण भारतीय म्हणून ज्याला सर्वोच्च मानतो, ते एकतेचे सार अधिक प्रगाढ केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रगतीची फळे येथील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवले जाण्याच्या सुनिश्चितीसाठी सरकार सज्ज आहे. आजचा हा निकाल केवळ एक कायदेशीर निर्णय म्हणून मर्यादित नाही, तर हा आशेचा एक किरण आहे, उज्वल भविष्याचे हे आश्वासन आहे आणि एक मजबूत आणि एकजूट भारत निर्माणासाठीच्या सामूहिक संकल्पाचा दाखला असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी म्हटले आहे.