जळगाव : तालुक्यातील विटनेर येथील एका प्रार्थनास्थळावर (मजार) पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर हिंदूत्ववादी कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले. या प्रकारानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांनी विटनेर गावाकडे धाव घेत घडलेला प्रकार जाणून घेतला तर एमआयडीसी पोलिसांना माहिती कळाल्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व सहकार्यांनी धाव घेत प्रार्थनावर फडकवण्यात आलेला ध्वज तातडीने ताब्यात घेतला. या प्रकरणी तक्रार देण्यात आली असली तरी गुन्हा दाखल झाला नव्हता.
सोशल मिडीयावर ध्वज झाला व्हायरल
बुधवारी दिवसभर विटनेर येथे पाकिस्तानह ध्वज फडकवण्यात आल्याची माहिती कळाल्यानंतर सोशल मिडीयातून याबाबत जोरदार टिकेचा सूर उमटला तर हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनीदेखील या प्रकाराविषयी तीव्र संताप व्यक्त करीत दोषींवर कारवाईची मागणी केली. सोशल मिडीयाद्वारे अनेकांनी ध्वजाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करीत या प्रकारामागे मोठे षडयंत्र होत असल्याचा दावा करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
पोलिसांनी घेतला ध्वज ताब्यात
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे व सहकार्यांनी बुधवारी दुपारी विटनेर गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली असता प्लंबर गोपाळ सुपडू कहार (नेरी, ता.जामनेर) यांनी हा ध्वज लावल्याचे समोर आले. संबंधिताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपल्याला स्वप्न पडल्याचे सांगून प्रार्थनास्थळावर (मजार) ध्वज नसल्याने तो लावण्याची आज्ञा झाल्याने आपण हा ध्वज लावल्याचे त्यांनी कबुल केले शिवाय असा ध्वज हा पाकिस्तानचा असतो, अशी आपल्याला कल्पनाही नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूलही केल्याने पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले.
अनावधानाने घडला प्रकार : जयपाल हिरे
विटनेर येथे ्रप्रार्थनास्थळावर लावलेला ध्वज पाकिस्तानी नसल्याची पूर्णपणे खात्री केली आहे. नेरी येथील व्यक्तीने श्रद्धेतून हा ध्वज लावला मात्र घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी ध्वज ताब्यात घेतला आहे. अनावधानातून घडलेल्या या प्रकाराविषयी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे निरीक्षक हिरे म्हणाले.
षडयंत्र असल्याचा संशय
विटनेर येथील दर्गा काही लोकांचा अड्डा असल्याचा संशय व्यक्त केला जात असून सर्वत्र धर्मांतरणाचे प्रकारही घडत असल्याचे बोलले जाते. तक्रारीनंतर सदरची मजार सील करण्यात आली असून याप्रकरणी बजरंग दल कार्यकर्ता हेमंत गुरव यांनी तक्रार दिली आहे. यामागे काही षडयंत्र आहे काय? याचा तपास केला जाणे गरजेचे आहे.