---Advertisement---

“कारमधून ऑइल पडतंय”, चोरट्यांचा बहाणा; लांबविली दीड लाखाची रोकड

---Advertisement---

जळगाव : कारमधून ऑइल पडत असल्याचे सांगून, चक्क चालकाचे लक्ष विचलित करून कारमधील १ लाख ५० हजाराची रोकडची बॅग लांबविली.  ही घटना शहरातील महात्मा गांधी रोडवर घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील गोपाल काशिनाथ पलोड (६७) यांचे दाणाबाजारात दुकान आहे. सायंकाळच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. यानंतर ते कारने महात्मा गांधी रोडने घरी निघाले होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पलोड यांना कारमधून ऑइल पडत असल्याचे सांगितले. यामुळे पलोड यांनी कर थांबविली.

चालकाचे लक्ष विचलित करून कारमध्ये ठेवलेली १ लाख ५० हजाराची रोकडची बॅग लांबविली. काही कळण्याच्या आत दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ही घटना लक्षात आल्यावर गोपाल पलोड यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment