---Advertisement---

कारवाईचा राग आल्याने, वाहन निरीक्षकाला दिली ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

शिरपूर : प्रमाणापेक्षा जास्त माल भरून वाहतूक करताना आढळून आलेल्या एका वाहनावर दंडात्मक कारवाईचा राग आल्याने नंदुरबार मधील वाहन निरीक्षक अतुल रमेश चव्हाण यांना त्यांच्या कार्यालयात येऊन शिवीगाळ करण्यात आली. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, ही घटना हाडाखेडा तपासणी नाक्यावर शनिवारी रात्री आठ वाजता घडली.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मोटर वाहन निरीक्षक अतुल रमेश चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली. चव्हाण हे सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर होते. दालनात कागदपत्रांची तपासणी करत असताना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एमपी ०९ एचएच १८७३ क्रमांकाचा ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा अधिक माल भरल्याचे स्पष्ट जाणवले. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही माहिती मिळताच दोन जण आले. त्यांनी जाब विचारत शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. खोटे गुन्हे दाखल करत लाचखोरीत अडकविण्याची धमकी दिली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment