काशीच्या पर्यटनाची वार्षिक उलाढाल २० हजार कोटींवर

नवी दिल्ली : काशी विश्वनाथ कॉरिडॉर सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. या दोन वर्षांत काशीतील पर्यटकांची संख्या १३ कोटींच्या वर तसेच धार्मिक पर्यटनाची वार्षिक उलाढाल २० हजार कोटी रुपयांवर गेली आहे. काशीमध्ये विमानतळापासून रेल्वे आणि रस्त्यांपर्यंतच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, काशी हे पर्यटन केंद्र म्हणून वेगाने प्रगती करीत आहे. आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये सुमारे ४.५ कोटी पर्यटकांनी काशीला भेट दिली होती. यावर्षी पर्यटकांची संख्या पाच कोटींच्या पुढे जाईल, तर धर्मशाळा आणि हॉटेलच्या खोल्या देखील सामान्यतः रिकाम्या राहणार नाहीत. एकट्या बनारसमध्ये हजारावर नोंदणीकृत हॉटेल्स आहेत. काशी विश्वनाथ धामने बनारसच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे. या धाममुळे सरकारच्या महसुलात ६५ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.