काहीजण ‘संविधान बचाव देश बचाव’ अस म्हणायचं सांगतील आणि मतं मिळवतील; अजित पवारांची विरोधकांवर टीका

छत्रपती संभाजीनगर: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षातील नेत्यांनकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्यातून अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले की, काहीजण सांगतात संविधान बचाव देश बचाव अस म्हणायचं. पण कोणताच माय का लाल संविधान बदलू शकत नाही .अस्वस्थ करण्याचं काम केलं जातं आहे. अजित पवार यांनी मोदी यांचे कौतुक करताना 135 देशात मजबूत नेता कोण आहे, अशी विचारणा केली. विरोधी पक्षांनी बोलण्याची पातळी सोडली असेल, तर आपण सोडू नका. पुढे ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम केले जातं आहे असे म्हणतील आणि महाराष्ट्रात मत मिळवण्यासाठी काम करतील, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. लोकसभा निवडणूक लागेल, त्यावेळी आपल्यासोबत असलेल्या पक्षाचं काम करायचे आहे असा सल्लाही त्यांनी दिला.