---Advertisement---

किरकोळ कारणावरून कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला; जळगावातील घटना

---Advertisement---

जळगाव : किरकोळ कारवानावरून महिलेसह मुलगा आणि पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना रविवारी १७ मार्च रोजी दुपारी पिंप्राळा हुडको भागात घडली. यात तिघे जखमी झाले असून,  याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील गौतम नगरात अलका भिमराव अहिरे या महिला आपल्या कुटुंबियांसह  वास्तव्यास आहे. १६ मार्च रोजी त्यांच्या गल्लीत राहणारी मुलगी मंदिरात आली. यावेळी अलका अहिरे या त्या मुलीला तुम्ही मटन खातात मंदिरात का येतात असे बोलल्या. या  कारणावरुन त्या मुलीची आईचे आणि अलका अहिरे यांच्यात शाब्दिक वाद झाले होते.

दरम्यान, रविवार १७ मार्च रोजी अलका अहिरे या महिलेच्या घराशेजारुन जात असताना पन्ना हा महिलेला पाहून शिवीगाळ करीत होता. तसेच त्याने घरात जावून धारदार शस्त्र आणले आणि त्या शस्त्राने त्याने महिलेच्या डोक्यावर आणि पोटावर मारुन गंभीर जखमी केले. महिलेवर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर महिला जखमी अवस्थेत असताना त्यांचा मुलगा सागर हा त्याठिकाणी आला. त्याला देखील पन्ना याने धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. महिलेच्या पती विश्वास चंडाले यांच्यावर देखील वार केले असून त्यांच्यावर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment