कुख्यात गुंड चिराग लोकेची हत्या ;मोहोळ,गवळी गँगसोबत होत कनेक्शन

नवी मुंबई: मुंबईसह राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अनेक गुंड आणि टोळ्यामध्ये टोळी युद्ध सुरू आहे. यातुन एकमेकांना ठार मारण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत.अशीच एक घटना नवी मुंबईत घडल्याने खळबळ उडाली आहे. गवळी आणि मोहोळ गँगशी संबंधित कुख्यात गुंड चिराग लोकेची हत्या करण्यात आली आहे.

माहितीनुसार चिराग लोके हा अरुण गवळी व पुण्यातील खून झालेल्या शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करत होता. चिरागची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहत नेरुळ पोलिसांनी त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. मंगळवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास चिराग व त्याची पत्नी प्रियंका हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात होते, यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडच्या साह्याने त्याच्यावर हल्ला केला.

यावेळी त्याची पत्नी प्रियंका त्याला वाचवण्यासाठी मध्ये गेली असता,या हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला करुन पलायन केले.यात चिरागचा जागीच मृत्यू झाला. मृत चिराग महेश लोके व आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा हे दोघे एकाच जेलमध्ये होते. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद डोसा व चिराग यांच्यामध्ये मानखुर्द येथे असलेल्या माथाडी साईटवरुन वाद सुरु होता. याच वादातून आरोपी अरविंद रामनाथ सोडा, अरबाज, पगला, शेरा व इतर दोन अशा एकुण पाच जणांनी त्यावर हल्ला करून त्याची हत्या केली.