---Advertisement---

कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये अन्‌‍ 30 मिनिटात चोरट्यांनी घर केले साफ

by team
---Advertisement---

जळगाव : कुटुंबातील सर्व सदस्य आजारी होते. त्यामुळे घराला कुलूप लावून हे सदस्य तपासणी व उपचाराकामी हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. ही संधी हेरत कुलूप कोयंडा तोडत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सोने चांदीचे दागिने तसेच रोकड घेऊन अर्धा तासात चोरटे पसार झाल्याची घटना श्रीकृष्ण पार्क मयुर कॉलनी पिंप्राळा येथे घडली. याप्रकरणी तक्रारीवरुन शनिवार 28 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनिल मधुकर वाणी (60) हे  प्लॉट नं. 7 श्रीकृष्ण पार्क, मयुर कॉलनी याठिकाणी वास्तव्यास आहेत. रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  बुधवार 25 रोजी अनिल वाणी यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य आजारी झाले. त्यामुळे सायंकाळी 7.30 वाजता घराला कुलूप लावून वाणी कुटुंब रिक्षात बसून खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार व निदान करण्यासाठी रवाना झाले. ही संधी हेरत चोरट्यांनी वाणी यांच्या घराला लक्ष्य केले. रिक्षा परिसरातून निघातच चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे लॉक तोडत आत एन्ट्री केली. 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने तसेच 20 हजाराची रोकड असा 1 लाख 65 हजार 500 रुपयांचा ऐवज घेत चोरटे अर्धा तासात पसार झाले. वाणी कुटुंब रात्री 8 वाजता घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी  तक्रारीवरुन 28 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि विठ्ठल पाटील करत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment