---Advertisement---

कुरीअरवाला सांगून अपार्टमेंटमध्ये एन्ट्री कुलूपबंद घर फोडून लांबविला मुद्देमाल

by team

---Advertisement---

 जळगाव : कुरीअर सप्लाय करत असल्याचे सांगून आदर्शनगरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रवेश करुन संशयिताने कुलूपबंद घर फोडून सोनेचांदीचे दागिणे तसेच रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दिलेली नाही.प्राप्त माहितीनुसार आदर्शनगरातील एका संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर व्यावसायिक कुटुंबासह वास्तव्यास आहेत.

ते औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कंपनीत जाण्यासाठी निघाले. त्याचवेळी या संकुलात एक तरुण आला. त्याला व्यावसायिकाने येण्याचे कारण विचारले असता कुरीअरवाला असून येथे पार्सल देण्यास आलो, अशी बतावणी करत त्याने संकुलात प्रवेश केला. संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर त्याने आवाज दिला. तसेच बेल वाजली. आतून महिला आली असता त्याने आडनाव सांगून ते येथे राहतात का? अशी विचारणा केली. महिलेने नकार दिल्यावर या संशयित तरुणाने तिसऱ्या मजल्याकडे मोर्चा वळविला. कुलूपबंद घर दिसल्यानंतर कडीकोयंडा तोडून त्याने घरात प्रवेश केला. कपाटातील मुद्देमाल घेत तो पसार झाला. ज्या व्यावसायिकाने या संशयिताला टोकले, त्याच व्यावसायिकाच्या घरात त्याने डल्ला मारल्याचे कळतयं.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---