---Advertisement---

कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश..निवडणूक लढवण्याची संधी मिळणार ?

by team
---Advertisement---

दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४ च्या आधी, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लकार्जुन खरगे यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपालही उपस्थित होते. आता दोघांचीही नावे पक्षाच्या उमेदवार यादीत येण्याची शक्यता आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट होण्यापूर्वीच विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी (६ सप्टेंबर) रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला होता.

दोन दिवसांपूर्वी विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून फोगाट आणि पुनिया काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, या दोघांच्या तिकीटाबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment