मथुरा येथे गरिबांना आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्या मिशनरी रॅकेटचा उत्तर प्रदेश पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू समाजातील गरीब, गरजू आणि निष्पाप लोक या मिशनऱ्यांच्या टार्गेटवर होते. त्यांना मोफत शिक्षण आणि आरोग्याचे आमिष दाखवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मिशनऱ्यांकडून केला जात होता. या छाप्यात मिशनरीशी संबंधित ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्तीचे धर्मांतर केल्याच्या माहितीवरून मथुरा येथील हायवे पोलीस स्टेशनच्या इंद्रपुरी कॉलनीतील घरावर छापा टाकण्यात आला. मिशनरी एजंट गरीब हिंदूंना आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा कट रचत असल्याची माहिती हिंदू संघटनांना मिळत होती. प्रसिद्धीच्या नावाखाली ५० हून अधिक लोक घरात जमा झाले. या कार्यक्रमाला प्रार्थना सभेचे नाव देण्यात आले होते. या रॅकेटचा म्होरक्या सॅनसान सॅम्युअल असून तो गुरुग्रामचा रहिवासी आहे.
राकेश रा. तुळशीनगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. स्थानिक पातळीवर मिशनरी रॅकेटमध्ये किती एजंट कार्यरत आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.