जळगाव : देशात तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलेलं आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील 50 लाख महिलांना लखापती दीदी बनवायचा संकल्प या ठिकाणी करू या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते लखपती दीदी संमेलनात बोलत होते.
याप्रसंगी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्य मंत्रिमंडळातील डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित आहेत.
उपमुख्यामंत्री पवार पुढे म्हणाले की. महिलांच्या वर जर आपण जबाबदारी टाकली तर महिला कोणती जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पेलू शकतात. या महाराष्ट्राची नेहमीच महिलांना मान दिलाय सन्मान दिलाय. सबल केलाय, सक्षम केलंय. गेले काही वर्ष चाललेल्या कार्यक्रमांमध्ये देखील महिला सबल सक्षम होत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्या लखपती महिला झालेल्या ज्या दीदी लखपती झालेल्या आहेत त्यांचा कौतुक करतो. परंतु, त्यांनी त्यांच्या पुरता लखपती राहायचं नाही तर इतर पण महिलांना लखपती करण्याच्या करता तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत हा शब्द देतो.