केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ४ दिवसांच्या दुबई दौऱ्यावर

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे आज ४ दिवसांच्या दुबई दौऱ्यावर रवाना झालेले आहेत.या ४ दिवसांच्या दुबई दौऱ्यात संयुक्त अरब अमिरात(युएई)मधील विविध उद्योजक तसेच अनिवासी भारतीय उद्योजक आणि महाराष्ट्रातून युएई मध्ये व्यापार उद्योगासाठी स्थायीक झालेल्या उद्योजकांची ना.रामदास आठवले संवाद साधणार आहेत. दुबईतील संपादक,आंबेडकरी विचारवंत,कलावंत आदिंच्या ते भेटी घेणार आहेत.

इंडो अरब इंटरनॅश्नल एक्सलंस अवॉर्ड या कार्पामात ना.रामदास आठवले हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत.दुबईत विविध आंतरराष्ट्रीय परिषदाना ना.रामदास आठवले.उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.दुबईमध्ये फ्रेंडस् ऑफ आरपीआय ची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे.त्या बाबत या दुबई दौऱयात विचार विनीमय करण्यात येणार आहे.

दुबई मध्ये भव्य बुध्द विहार आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचा ना.रामदास आठवले यांचा संकल्प आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दुबईत पुतळा उभारण्यासाठी दुबईतील मान्यवरांशी या दौऱ्यात ना.रामदास आठवले विचार विनीमय करणार असल्याची माहीती रिपाइं तर्फे देण्यात आली आहे.