केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार ‘विदर्भ’ दौऱ्यावर

नागपुर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रामधील दौरे अचानक वाढले आहे. या नव्या वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी दोन वेळा महाराष्ट्र दौरा केल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सुद्धा विदर्भामध्ये दौरा निश्चित करण्यात आला आहे. अमित शाह 15 फेब्रुवारी रोजी अकोला दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे.

विदर्भातील लोकसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ फेब्रुवारी रोजी अकोला येथे येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पश्चिम विदर्भामध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये अमित शाह कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी अमित शाह यांचा संवाद साधणार आहेत. हा दौरा निश्चित होत असतानाच 19 फेब्रुवारी रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्याकडून कोस्टल रोडचे लोकार्पण करण्यात येणार आहेत.