केंद्र सरकारची मोठी कारवाई, 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी

केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेत 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. अश्लील साहित्याचा प्रसार करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. अश्लील साहित्याचा प्रसार करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचा इशारा याआधीच केंद्र सरकारने दिला होता.

या प्लॅटफॉर्मवर एका कंटेटचा मोठा भाग हा अश्लील, आक्षेपार्ह आणि महिलांसाठी अपमानास्पद असल्याचे आढळून आले. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 आणि 67ए, आयपीसीचे कलम 292 चे उल्लंघन असल्याचे दिसून आले असून केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेत 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.

या OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली
Dreams Film, Voovi, Yessma, Uncut Adda, Tri Flicks, X Prime Neon,X VIP, Besharams,Hunters Rabbit, Xtramood,Prime Play, Mojflix Nuefliks, MoodX, Hot Shots,VIP Chikooflix, Fugi