---Advertisement---
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री मोठा निर्णय घेतला. आता दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ साजरा केला जाणार आहे. हैदराबाद स्वतंत्र्य लढ्यातील शहीदांचे बलीदान लक्षात राहवे यासाठी हा म्हूणन दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गृह मंत्रालयाने याबद्दल अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये हैदराबात १५ ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र झाल्यानंतर देखील १३ महिने निजामांच्या शासनाखाली होता आणि त्याला स्वतंत्र्य मिळाले नव्हते. ऑपरेशन पोलो नावाने पोलीस कारवाई नंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादच्या निजामाच्या शासनापासून मुक्तता मिळाली. गृह मंत्रालयाने म्हटलं की या परिसरातील लोकांती मागणी होती की १७ सप्टेंबर हैद्राबाद मुक्ती दिवस म्हणून साजार केला जावा.
तसेच अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, आथा हैदराबादला स्वतंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीदांच्या आठवणीत आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी मोदी सरकारने दरवर्षी १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा केला जाईल.