कोण आहेत अमन गुप्ता ? ज्यांना मिळाला ‘सेलिब्रेटी क्रिएटर ऑफ द इयर’ अवॉर्ड

National Creators Award : दिल्लीत आयोजित भारत मंडपम या कार्यक्रमात एकूण 23 निर्मात्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवार दिल्ली येथे राष्ट्रीय निर्माते पुरस्कारांचे वितरण केले.

यावेळी पीएम मोदींनी ‘शार्क टँक’ फेम अमन गुप्ताला ‘सेलिब्रेटी क्रिएटर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केले. अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला असून, तरुणांना त्यांच्या सर्जनशीलतेसाठी प्रेरित करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

देशातील सर्वात मोठी कंपनी बोटचे सह-संस्थापक अमन गुप्ता यांनी 2016 मध्ये ही कंपनी सुरू केली. अमनची शिप्रॉकेट, बमर, 10 क्लब सारख्या स्टार्टअप्समध्येही भागीदारी आहे. अमन गुप्ता यांनी अगदी लहान वयात मोठे पद मिळवले आहे. अमन गुप्ता यांचा जन्म 1984 साली एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सीए केले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे. यानंतर त्यांनी boAt ची स्थापना केली.