जळगाव : भारतीय जनता पक्षाने आजवर अनेक महिलांना निवडणुकीत संधी देत मोठ्या पदांवर पोहचवले आहेत. जळगाव लोकसभेसाठी देखील भाजपने एका महिलेला संधी दिली आहे. अर्थात स्मिता वाघ यांना. पण भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेल्या स्मिता वाघ या कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का ? चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबदल…
कौटुंबिक पार्श्वभूमी
जन्म: २६/०३/१९६८
गाव: डांगर बु. ता.अमळनेर जि. जळगाव
माहेर: अंदरसूल ता. येवला जि.नाशिक
शिक्षण : बी. ए. ( मानसशास्त्र पर्यंत शिक्षण)
विद्यार्थी चळवळ
१९८५ ते १९९० जळगाव शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनापासून शैक्षणिक चळवळीत प्रमुख योगदान.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक बांधिलकी व संघ परिवाराच्या कार्यात सहभाग.
विवाह
२१ मे १९१९० रोजी उदय भिकनराव वाघ यांच्या समावेत विवाहबद्ध.
पत्रकारिता
संपादिका साप्ताहिक जन सत्याग्रही.
राजकीय वाटचाल
उद्यामी महिला पतसंस्थेच्या संचालिका म्हणून आर्थिक क्षेत्रात महिला कल्याणासाठी कार्य.
१९९२ भाजपच्या कार्यात सहभाग व सक्रिय.
१९९६-९७ मध्ये जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उत्कृष्ट उद्योजिका पुरस्काराने गौरव.
२००२ ते २०१५ पर्यंत सलग ३ वेळा सदस्य जी.प. जळगाव.
२००३ जिल्हाध्यक्षा भाजपा महिला मोर्चा जळगाव.
२००५ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सिनेट निवडणुकीत जळगाव ,धुळे व नंदुरबार मधून सर्वाधिक मतांनी विजयी.
२००६ ते २००८ प्रदेश चिटणीस भाजपा महाराष्ट्र.
२००९ राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य भाजपा.
२००९ ते २०१२ पहिली महिला अध्यक्षा जि. प. जळगाव.
२०१२ ते २०१५ प्रदेशाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र राज्य.
२०१७ पासून प्रदेश चिटणीस, भाजपा महाराष्ट्र राज्य.
२३ जानेवारी २०१५-२०२० महाराष्ट्र विधान परिषद आमदार.
२०१८ पासून सिनेट सदस्य कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव
२०२२ पासून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष
२०२३ फेब्रुवारी पासून जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ संचालिका
२०२१ पासून अध्यक्ष:स्मितोदय फाउंडेशन