कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. चव्हाणांच्या राजीनाम्याव नाना पटोलेंच ट्विट

मुंबई:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. यानंतर चव्हाण यांनी माध्यमांसमोर येऊन आपले मत मांडले. अशोक चव्हाण म्हणाले की, मी माझा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे, हा माझा स्वतःचा निर्णय आहे.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून भाष्य केले आहे. पटोले म्हणाले, पक्षानं ज्यांना सर्वकाही दिलं ते लोक पक्ष सोडून जात आहेत हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं. काँग्रेस पार्टी संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढतोय, असं नाना पटोले म्हणाले. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि विचारधारेच्या जोरावर संघर्ष करु आणि भाजपला पराभूत करु, असं नाना पटोलेंनी म्हटलं.

नाना पटोले म्हणाले की, कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू असही ते यावेळी म्हणाले.