कोलकाता : आर जी वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्रात पीडित युवतीला सुवर्ण पदक पटकवायचे होते अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली. पीडितीने तिच्या डायरीत सुवर्णपदक पटकवणार असल्याची इच्छा लिहून ठेवली होती. ती खूप मेहनती असून तब्बल १० ते १२ तास अभ्यास करायची, अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तिच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आपल्या पीडित लेकीच्या भावना सांगितल्या.
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना, पीडितेच्या बाबांनी आपल्या मुलीने लिहिलेल्या इच्छेबाबत सांगितले आहे. ते म्हणाले की, आमची मुलगी खूप हुशार होती. आतापर्यंत मेहनतीच्या जोरावर ती इथपर्यंत आली. ज्यादिवशी तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली त्याचदिवशी तिने आपल्या डायरीत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सुवर्ण पदक पटकवण्याची इच्छा लिहून ठेवली होती.
आपली मुलगी हयात नसल्याने स्वप्न भंगले आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आपल्या मुलीवर झालेल्या बलात्काराविरोधात सारा देश एकवटला आहे. बलात्कारी नराधमास फाशीची शिक्षा व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आरोपींना शिक्षा मिळाल्यानंतर दिलासा मिळेल असे पीडितीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
याचदरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. पीडितेवर ज्याप्रकारे अमानुष अन्याय, अत्याचार करण्यात आले त्यावरून हा सामुहिक बलात्कार असल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असूनही वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आरोपींविरोधात एफआरआय का दाखल केला नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, कोलकात्यातील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी पीडितेवर अमानुष अत्याचार कऱण्यात आला होता. त्यावेळी तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पीडितेचा मृतदेह दाखल करण्यात आला. त्यावेळी याप्रकरणात तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रकरणात सुरूवातीला प.बंगालमधील पोलिसांवर प्रश्नचिन्हे उपस्थित होताना दिसत होते. त्यानंतर हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिले. दरम्यान याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी संतापले आहेत. त्यांनी आंदोलन पेटवले असून प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.