इंडियन प्रीमियर लीग दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरंतर, इंग्लंडचा दिग्गज फिरकीपटू डेरेक अंडरवूड याचं निधन झालं आहे. आपल्या काळातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेल्या डेरेक अंडरवूडने वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अंडरवूडचे सोमवारी निधन झाले.
भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांना आपल्या गोलंदाजीने अडचणीत आणणारा अंडरवूड 60 आणि 70 च्या दशकातील खेळपट्ट्यांवर खेळणे धोकादायक होता. मोठमोठे फलंदाज त्याच्यासमोर झुंजत होते आणि धावा काढण्यासाठी धडपडत होते. या अनुभवी फिरकीपटूच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास 2500 विकेट्स आहेत.
इंग्लंडच्या या दिग्गज फिरकीपटूने आपल्या काळात मोठ्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. या अनुभवी फिरकीपटूच्या नावावर 86 कसोटी सामन्यांमध्ये 297 विकेट आहेत. आजही डेरेक अंडरवूड हा कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज आहे. अंडरवूडच्या नावावर 86 कसोटीत 297 विकेट आहेत.