जळगाव: भाजपची साथ सोडत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन जून २०२२ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत.
काल अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्ष्याला रामराम ठोकला असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे, अश्यातच राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे हे देखील परत भाजपच्या वाटेवर आहेत का ? असा प्रश्न राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना विचारला असता, महाजन यांनी सांगितले की, याबाबत मला कुठली माहिती नाही. मात्र, एकनाथ खडसे हे वर दिल्लीवरून जोर लावून प्रयत्न करीत आहेत. याबाबत मला दिल्लीवरून आणि राज्यापातळीवरुन माहिती मिळाली. मला या संदर्भात कुठलीही विचारणा केलेली नाही. मी एक लहान कार्यकर्ता असे महाजन यांनी सांगितले.
महाजन यांचा दावा एकनाथ खडसे यांनी फेटाळला असून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहणार असून कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, गेले काही दिवसांपासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे, असं एकनाथ खडसे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.