खलिस्तानी प्रमुख पन्नून कडून चीनला भारतावर आक्रमण करण्याचा सल्ला

कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेविड मॉरिसन यांनी भारत हा एक देश आहे. त्यांच्या संप्रभुतेचा सन्मान केला जावा, असे म्हटले होते. कॅनडाच्या मंत्र्यांनी भारताच्या अखंडतेवर वक्तव्य केल्याने पन्नू खवळला असल्याने. याविरोधात पन्नूने एक व्हिडीओ जारी केला आहे.

विदेशात राहून भारताला आव्हान देण्याचे प्रयत्न काही जणांकडून होत असल्याचे समोर येत आहे. अशातच खलिस्तानी संघटना सिख फॉर जस्टिसचा अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नून याने भारताविरोधात गरळ ओकली आहे. पन्नूनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअऱ करत त्यात खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारतातील राज्यांना वेगळे करण्यासाठी मोहिमा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. तसेच चीनने अरुणाचल प्रदेशावर हल्ला करण्याची वेळ आली आहे, असेही वक्तव्य केले आहे. आता पन्नूने जम्मू-काश्मीर, आसाम, मनिपूर आणि नागालँडला स्वातंत्र्य मिळविण्यासाठई आंदोलन करण्याच्या मोहिमा आखण्याचा इशारा दिला आहे. कॅनडाच्या मंत्र्यांनी भारताच्या अखंडतेवर वक्तव्य केल्याने पन्नू खवळला असल्याने. यातून त्याने आता खलिस्तानी कारस्थानांना चीनचा पाठिंबा मिळतो का हे पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर गुरपतवंत सिंह पन्नूने चीनला भारतावर आक्रमण करण्याचा सल्ला दिला आहे.

शिख फॉर जस्टिस ही संघटना पंजाबला भारतापासून वेगळे करून खालिस्तानची स्वतंत्र देश म्हणून निर्मातीची मागणी करत आहेत. संघटनेच्या अश्या मागणीला पंजाब येथून कोणीच समर्थन दिले नाही. गुरूपवंत सिंह पन्नून हे अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये राहतो. त्याने आपल्या व्हिडिओत जम्मू-काश्मीर, आसाम, मणिपूर आणि नागालँड या स्वतंत्र्यासाठी आंदोलन करणार असे सांगितले.

खलिस्तानी अतिरेकी पन्नूनने आपल्या व्हिडिओमध्ये चीनने भारतावर हल्ला करण्याचा सल्ला दिला आहे. तो राष्ट्रपती शी जिनपिंग यांना म्हणाला की, चीनने आपल्या लष्करांसह अरूणाचल प्रदेशावर आक्रमण करण्याचे आदेश द्यावे. अरूणाचल हा चीनचा भाग आहे. माझे भारताला आव्हन देण्याचे काम सुरूच आहे.