जळगाव : अमळनेर शहरात एका २८ वर्षीय महिलेचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना रविवार, २२ रोजी घडली. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन मृतदेह अमळनेर रुग्णालयात हलविला. शीतल जय घोगले (२८) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान, खुनाचे रहस्य उलघडण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात शीतल जय घोगले (२८) ही महिला वास्तव्याला होती. दरम्यान, रविवार, २२ रोजी गांधलीपुरा परिसरात अज्ञाताने या महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन मृतदेह अमळनेर रुग्णालयात हलविला.
दरम्यान, हा खून नेमका कोणी आणि का केला ? याबाबत अद्याप माहिती समोर आली नसून, खुनाचे रहस्य उलघडण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, गणेश पाटील, सागर साळुंखे, निलेश मोरे, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी पाटील, दीपक माळी, संदीप पाटील यांनी पाहणी केली.