खळबळजनक! सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

धरणगाव:  मधील अनोरे गावातील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गुरुवारी २१ मार्च रोजी सकाळी अनोरे शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली हा खळबळजनक प्रकार समोर आल्या नंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल संतोष पाटील रा.अनोरे ता. धरणगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील वाडीभोकर येथील माहेर असलेल्या विवाहिता शीतल पाटील यांचा विवाह सन २०१३ मध्ये धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील संतोष पाटील यांच्याशी रीतीरिवाजाप्रमाणे लग्न झालेले आहे. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले. परंतु त्यानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरुवात केली वेळोवेळी सुरू असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गुरुवार २१ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आनोरे शिवारातील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बाकी संतोष हिरामण पाटील, सासु राजपूतबाई हिरामण पाटील, सासरे हिरामण अभिमान पाटील यांच्या विरोधात गुरुवार २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक करीम सय्यद हे करीत आहे.