तरुण भारत लाईव्ह । १० ऑक्टोबर २०२३। आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. अशातच कर्नाटक मधून एका अपघाताची बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील विजयनगरमध्ये तीन वाहनांची जोरदार धडक झाली. खाणकामातील दोन टिप्पर लॉरी आणि क्रूझर कार यांच्यात ही भीषण टक्कर झाली. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सूत्रानुसार, हॉसपेट येथील रहिवासी बसवेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. हॉसपेट शहराच्या बाहेरील मरियमनहल्ली पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली. लॉरीचा एक्सल तुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. टिप्पर आणि क्रूझर यांच्यात हा अपघात झाला. क्रूझरमध्ये 13 प्रवासी प्रवास करत होते. जखमींची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.