जळगाव : विविधतेत एकता जपणारा हा भारत देश आपल्या हेरिटेज आणि संस्कृतीमुळे नेहमीच विशेष ठरतो. भारताची हीच अनोखी ओळख जपत जळगावची गायत्री ठाकूर हिने मिस हेरिटेज इंडिया 2022 किताब गेल्यावर्षी पटकावला आहे. यावर्षी थायलंड येथे होणाऱ्या मिस हेरिटेज इंटरनॅशनल 2023 साठी भारताची हीच अनोखी ओळख जपत राष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान गायत्री ठाकूर हिने पटकावला आहे.
ब्युटी विथ ब्रेन या थीमवर आधारित मिस हेरिटेज हा एक अनोखा ब्युटी पेजंट आहे. यात ब्युटी विथ ब्रेन सोबतच हेरिटेजला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आणि हा अनोखा ब्युटी पेजंट दरवर्षी मृणाल गायकवाड यांच्या मृणाल एन्टरटेन्मेंटकडून आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय स्तरावरील हा शो पुणे येथे मागील वर्षी आयोजित केला गेला होता. त्यात जळगावच्या गायत्री ठाकूर हिने तिचा सहभाग नोंदविला होता. ऑडिशन, ग्रूमिंग अशा विविध स्पर्धात्मक फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून अखेर मिस हेरिटेज इंडिया 2022 हा विनिंग टायटल आणि मिस फोटोजेनिक हेरीटेज 2022 हे सबटायटल पटकावून गायत्री ठाकूर ही विजयी मानकरी ठरली. मिस हेरिटेज इंडिया पेजेंटच्या विजयी
उमेदवारांना पुढे इ प्लॅनेट यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मिस हेरीटेज इंटरनॅशनलसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. यावर्षी 18 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या 9 दिवसाच्या थायलंड येथे झालेल्या मिस हेरीटेज इंटरनॅशनल 2023 ची भारताचे प्रतिनिधित्व तीने केले आहे.
मागील वर्षी झालेल्या मिस हेरिटेज इंडिया 2022 साठी गायत्रीने हेरिटेज सादरीकरणासाठी अजिंठा थीमची निवड केलेली आहे. तिला ॲड. राजेश झाल्टे यांच्याकडून आर्थिक स्वरूपात मदत तसेच नॅशनल कॉस्च्युम प्रोपसाठी एम आर्ट स्टुडिओ – मुनेश ढाके आणि निखिल सरोदे यांचे सहकार्य लाभलेले आहे. मुख्य फायनलचा एवेनिंग गाऊन हा पुण्यातल्या रविना शहा, शुभ स्टुडिओ यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आला आहे. तिचे इतर कॉस्च्युम जळगावच्या डिजायनर जागृती हसवानी यांच्याकडून स्पॉन्सर होत आहे. त्यासोबत आतापर्यंतच्या तिच्या तयारीत आणि शूटमध्ये जळगावची हेअर अँड
मेकअप आर्टिस्ट अमृता भोगरे यांचा महत्वाचा वाटा आहे.
रिल्सच्या माध्यमातून कलेचे सादरीकरण
मूळची जळगावची गायत्री ठाकूर ही नृत्यांगना, मॉडेल, थिएटर आर्टिस्ट तसेच मुंबई विद्यापीठातून लोककला पदवीधर आणि जळगावच्या एम. जे. कॉलेज येथून लोकनृत्य पदवीधर आहे. तसेच बराचश्या ब्रँड्ससाठी गायत्रीने मॉडेलिंग केलेली आहे त्यासोबत गायु ठाकूर म्हणून रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्ध आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ती लावणी या लोकनृत्याचं सादरीकरण आणि त्याचा जागर करत आली आहे.