खालच्या पातळीवरून खरेदीमुळे बाजार तेजीसह बंद

शेअर बाजार: आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 535 अंकांच्या उसळीसह 73,158 अंकांवर तर निफ्टी 162 अंकांच्या उसळीसह 22,217 अंकांवर बंद झाला. भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी गुरुवारचे ट्रेडिंग सत्र चांगलेच गेले. सकाळच्या व्यवहारात भारतीय बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स जवळपास 600 अंकांनी तर निफ्टी 180 अंकांनी घसरला होता. मात्र खालच्या पातळीवरून बाजारात खरेदीचे पुनरागमन झाल्याने तेजी दिसून आली. निफ्टीने दिवसाच्या नीचांकी स्तरावरून 375 अंकांची वाढ पाहिली, तर सेन्सेक्समध्ये 1150 अंकांपेक्षा जास्त वाढ झाली.

विक्रमी उच्चवर बाजार मूल्य
परतीच्या खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी आली, त्यानंतर बाजाराच्या बाजारमूल्यात मोठी उसळी पाहायला मिळाली. आज बाजार बंद होताना, बीएसई सेन्सेक्सचे बाजार भांडवल 392.19 लाख कोटी रुपये होते, जे विक्रमी उच्च बंद पातळी आहे. तर गेल्या ट्रेडिंग सत्रात बाजारमूल्य 388.87 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात बाजारमूल्यात ३.३२ लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.