नवी दिल्ली : संसदेची सुरक्षा भेदून लोकसभेत दोन युवकांनी घुसखोरी केली होती. विरोधी पक्षांच्या खासदारांनी या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली मात्र सरकारकडून ती मान्य केली जात नसल्यानं आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांवर लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली.
यामध्ये आतापर्यंत तब्बल लोकसभेसह राज्यसभेतून विरोधकांचे १४१ खासदार निलंबित करण्यात आलेय. दरम्यान, आज बुधवारी खासदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत आंदोलन केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संसदेमधून खासदारांचं निलंबन केल्या विरोधात दिल्लीतल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस मार्फत आंदोलन करण्यात आले.