खासदार रक्षा खडसे : महामार्ग मंत्री नितीन गडकरीना दिले निवेदन

रावेर : ब-हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३ तळोदा जंक्शनजवळ सुरू होणारा तळोदा-शिरपूर- चोपडा-यावल-फैजपूर-सावदा- रावेर या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या २४० किमी महामार्गाचे चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनादरम्यान केली.

रावेरसह सावद्याला वगळल्याने नाराजी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दर्जावाढ व चौपदरीकरणसाठी खासदार रक्षा खडसे यांचा मागील काही वर्षापासून केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित मंत्री यांच्याकडे निरंतर पाठपुरावा सुरू होता गतवर्षी सदर राज्यमार्गाच राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले. सध्या देखभाल दुरुस्तीसाठी ६१ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. चौपदरीकरणसाठी डीपीआर तयार होऊन जमीन संपादनासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत ७ डिसेंबर रोजी आदेश देण्यात आले आहे. त्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. रावेर व सावदा शहरास चौपदरीकरण मध्ये वगळण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असत्याने स्थानिकांच्या नागरीकांच्या मागणीनुसार आधीच्या मूळ मागनिच रावेर व सावदा शहरातून घेण्यात यावा यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.