जळगाव : तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर सध्या चांगली संधी आहे. तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल, तर आज तुम्हाला स्वस्त दरात सोने खरेदीची संधी आहे. म्हणजेच आज तुम्हाला दागिने खरेदी करण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली असून, चांदीच्या भावातही प्रति दहा ग्रॅममध्ये किंचित वाढ झाल्याचे चित्र आज 20 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पाहायला मिळाले. 19 सप्टेंबर रोजी सोन्याचा दर प्रत्येक दहा ग्रॅमला 59हजार 390 इतका होत . मात्र यात आज घसरण होऊन सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ला 59 हजार 300 रुपये इतका झाला.
तसेच चांदी 19 सप्टेंबर रोजी प्रति किलो 72 हजार 420 रुपये इतकी होती यात केवळ दुपारी तीन वाजेपर्यंत दहा रुपयांची अतिरिक्त वाढ होऊन चांदी 72 हजार ४३० रुपये प्रति किलो भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले.
नुकतेच गणरायाचे आगमन झाले असून वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. सोने व चांदीच्या दरात घसरण आणि किंचित वाढ झाल्यामुळे सोने खरेदीसाठी हा काळ चांगला असल्याचे सुवर्ण बाजारातील तज्ञांनी मत व्यक्त केले.